Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeक्राईमक्राईम डायरी- मुजरीम कितना भी शातीर हो, कोई ना कोई सुराग पिछे...

क्राईम डायरी- मुजरीम कितना भी शातीर हो, कोई ना कोई सुराग पिछे छोड ही जाता है! बीड बायपासवरील ‘त्या’ थरारक घटनेचा 12 तासात छडा


गुन्हेगारने कितीही सफाईदारपणे गुन्हा केला तरी तो काही ना काही धागेदोरे
मागे ठेवतच असतो. मग तो गुन्हेगार कितीही हुशार असला आणि कितीही सफाईदारपणे गुन्हे करत असला तरी तो कायद्याच्या कचाट्यात सापडतोच कारण ‘कानून के हाथ लम्बे होते हैं…!’ मात्र अलीकडच्या काळामध्ये हायटेक गुन्हेगार सक्रिय झाल्यामुळे पोलिसांना ते मागे पुरावे सोडत नाहीत; त्यामुळे अनेक गुन्हे उघड करतांना पोलिसांना मोठया अडचणीचा सामना करावा लागततो. बीड एलसीबी आणि ग्रामीण पोलिसांनी छोटासा धागा पकडून असाच एक गुन्हा उघड केला आहे. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासवर घडलेल्या ‘त्या’ थरारक दरोड्याच्या घटनेचा मोठ्या कौशल्याने आणि तत्परतेने अवघ्या 12 तासात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या बादत केलेली कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. दरोडेखोरांनी या दरोड्यासाठी पूर्ण एक महिना अगोदर ‘प्लॅनिंग’ केली होती वेळ आणि काळ त्यांनी निश्‍चित करत दरोडाही टाकला मात्र पोलिसांनी बीड ते पुणे प्रवास करून अवघ्या 12 तासात आरोपींच्या मुसक्या बांधल्या. हे शक्य झाले ते फियार्दी यांनी गुन्हा घडल्याक्षणी पोलिसांची मदत घेत त्यांना तपासात तत्काळ संपूर्ण मदत केल्याने.

आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या मालकाप्रति आपण प्रामाणीकच असले पाहिजे, कारण त्यांनी आपल्या हाताला काम दिल्यामुळेच आपण आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करत आहोत. मग ती संस्था असो, शेती असो की एखादा छोटामोटा उद्योग असो. मात्र पृथ्वीतलावर माणुसच असा एक प्राणी आहे ज्याला कितीही पैसे मिळाले तरी त्याचे पोट भरत आहे. मुळात मासाला जास्त पैसा आला तरी तो पुरत नाही. जसा पैसा जास्त येईल तशा त्याचा गरजा वाढतातच. मुद्दा हा आहे की आपण आपले काम आणि मालका प्रति प्रामाणीक राहिले पाहीजे म्हणतात ना ‘ज्या ताटात खातो त्याच ताटात….. करु नये’ मात्र काही जण पैशाच्या हव्यासापोटी वाट्टेल ते करतात अन् नंतर पश्‍चाताप करुनही त्याचा काहीच उपयोग होत नाही. अशीच एक घटना केज तालुक्यातील असून ती बीड बायपासवर घडलेली आहे.

crime dayri logo 2


नुकताच दोन चार दिवसापूर्वी जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला होता तोच पुन्हा शनिवार दि. 4 सप्टेंबर 2021 रोजी संध्याकाळीही पाऊस मनसोक्त बरसत होता. तेवढ्यात बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचा फोन खणाणला आन् समोरून घाबरलेल्या आवाजात ‘साहेब आमची बीड बायपासवर अद्यात चोरट्यांनी गाडी अडवून कॅश लुटली आहे. वगैरे वगैर माहिती समोरुन सांगण्यात आली. या घटनेचे गांभिर्य ओळखून तत्काळ ठाणेप्रमुख पीआय संतोष साबळे यांनी सोबत जयसिंग वाघ यांना घेवून घटनास्थळ काठले. तोपर्यंत याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सतिष वाघ यांनाही मिळाली होती. त्यांनीही घटनेचे गांभिर्य ओळखून तपासाची चर्के फिरवली. त्यावेळी फिर्यादी अनिरुद्ध संभाजी मुळे (वय 25 वर्षे व्यवसाय खाजगी नौकरी रा. कानडी रोड केज ता. केज जि.बीड) हे पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे येऊन त्यांनी प्रथम पोलिसांना हकीगत सांगितली. की ‘महालक्ष्मी चौकापासून अंदाजे 04 कि.मी अंतरावर बीड बायपास बहीरवाडी शिवारातून जात असताना आमच्या पाठीमागून आम्हाला पाडळशिंगी टोलनाक्याजवळ ओहरटेक करुन आलेली पांढर्‍या रंगाची स्वीप्ट कार पिवळी पाठी असलेली अंदाजे सांयकाळी 05.00 वाजणेचे सुमारास लाईट देऊन ओहरटेक करुन आमच्या पिकअपला आडवी लावली. आणि आमच्या जवळ असलेली कॅश लुटून पळ काढला. त्या गाडीला नंबर प्लेट नव्हती. ती मांजरसुंबा मार्गे गेली वगैरे वगैरे सांगितले. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पीआय सतिष वाघ, बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेप्रमुख पीआय संतोष साबळे, ग्रामीणचे पीएसआय पवनकुमार राजपुत, एलसीबीचे पीएसआय भगतसिंग दुल्लत आणि पोलिस कर्मचार्‍यांनी पाडळसिंगी टोलनाका येथे जावून तक्रारदारांनी सांगितलेल्या वर्णनाच्या गाड्या त्यांनी तेथील सिसिटीव्ही फुटेजमध्ये चेक केल्या. त्यात त्यांना तशा वर्णनाच्या चार ते पाच गाड्या मिळाल्या. त्यात त्यांनी सर्व गाड्यांची क्रॉस चेकिंग केली असता त्यांना एक धागा हाती लागला अन् सुरु केला पोलिसांनी त्या गाडीचा शोध.
इकडे रात्री अनिरुद्ध संभाजी मुळे यांनी बीड ग्रामीण पोलिसांना सविस्तर फिर्याद दिली. ते धंनजय चौरे (रा. जिवाचीवाडी ता.केज) यांच्या उंबरी फाटा केज येथील विशाल डेअरी मध्ये मॅनेजर म्हणुन खाजगी नौकरी करतात. सदर डेअरी मध्ये गोड खवा व मिल्क केक विक्री करणे व वसुली करण्याचे काम ते पाहतात. ते संपूर्ण महाराष्ट्रात ऑर्डर येईल तसे डिलेव्हरी पोहच करतात. किरकोळ मध्ये स्वीटमार्ट व होलसेल मध्ये डिलर यांना डिलेव्हरी ही ते देतात. दि. 03 सप्टेंबर 2021 रोजी ते आणि विशाल डेअरी मधील ड्रायव्हर (चालक) वामन लक्ष्मण चौरे (रा. जिवाचीवाडी ता.केज) हे विशाल डेअरीची बोलेरो पिकअप बंद बॉडीची जिचा क्र. (एम. एच. 14 एच यू 8086) या मध्ये गोड खवा 70 बॅग 2000 किला, मिल्क केक 14 बॉक्स 378 किलो असे पिकअप मध्ये भरुन ते दोघेजण केज येथुन सकाळी 07. 45 वाजता डिलेव्हरी देण्यासाठी निघाले होते. तेथुन बीड पाथर्डी येथे डिलेव्हरी दिली. त्यांच्या कडून गोड खवा व मिल्क केक चे पैसे घेतले व पाथर्डी येथे डेअरीला पैसेची गरज असल्याने महाराष्ट्र बँक शाखा पाथर्डी येथे जमा झालेले 1,39,400 रुपये भरले व तेथून पाडळशिंगी फाटा येथे येऊन गेवराई -शहागड- अंबड -जालना येथे डिलेव्हरी देत गेले जालना येथे उशीर झाल्याने सिटी प्राईज लॉजवर मुक्कामास थांबले. त्यानंतर दि. 04 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 07.00 वाजता लॉजवरून फ्रेश होऊन निघून चंदनजिरा जालना व भोकरदन, राजुर केदारखेडा, शिल्लोड येथे गोड खवा व मिल्क केक विक्री केला. त्यामध्ये सर्वांनी जवळजवळ पैसे दिले होते. काहींनी अँडवॉन्स व काहीनी बाकी दिली होती. असे त्यांच्याकडे जवळपास 1,95,600 रुपये जमा झाले होते. ते त्यांनी स्वत:जवळ असलेेल्या काळ्या रंगाच्या बॅग मध्ये ठेऊन पैसेची बॅग ड्रायव्हर च्या कॅबीन दोघांच्या मध्ये ठेऊन परत केज कडे निघाले. सांयकाळी 04.15 वाजता पाडळशिंगी टोल नाक्याच्या मागे एका पांढर्‍या रंगाची स्वीप्ट कार ओहरटेक करून पुढे गेली. ते सोलापुर धुळे रोडने बीड कडे येत असतांना त्यांना चौरे कोल्ड स्टोअरेज येथून गोड खवा घेऊन येणे बाबत मालकाने सांगितले असल्याने ते चौरे कोल्ड स्टोअरेज रामनगर येथे जावून तेथून 70 बॅग गोड खवा पिकमध्ये टाकुन पुन्हा बीड बायपास रोडने केज कडे निघाले. महालक्ष्मी चौकापासून अंदाजे 04 कि.मी अंतरावर बहीरवाडी शिवारातून जात असताना पाडळशिंगी टोलनाक्याजवळ ओहरटेक करुन आलेल्या पांढर्‍या रंगाच्या स्वीप्ट कार पिवळी पाठी असलेली अंदाजे सांयकाळी 05.00 वाजणेचे सुमारास लाईट देऊन ओहरटेक करुन मुळे यंाच्या पिकअपला आडवी लावली. त्या मधून तीघेजन आले एक इसम मुळे यांच्या बाजुने तर एक इसम ड्रायव्हर च्या बाजूने गेला व एक समोर उभा राहिला मुळे यांच्या समोर उभा राहिलेल्या इसमाने माल काय आहे. गाडीत खाली उतर मला दाखव असे म्हणून मुळे यांना खाली उतरवले. त्याच वेळी दुसर्‍या इसमाने ड्रायव्हरला धमकावून मागे घेऊन गेला व ड्रायव्हर पिकअपची कॅबीन उघडत असतांना मुळे यांनी मोबाईल फोन करण्यासाठी काढला असता त्याने ‘मोबाईल कशाला काढला’ असे म्हणुन हाततुन घेऊ लागला. मुळे यांनी तो दिला नाही. मात्र समोर थांबलेल्या इसमाने पिकअप मध्ये ड्रायव्हरच्या कॅबीम मध्ये ठेवलेली 1,95,000 रुपयाची बॅक घेऊन स्वीप्ट कार मध्ये जावून बसला व चला रे असे म्हणून ते दोघेजन स्वीप्ट कारमध्ये बसून बायपास रोडने सोलापुर मांजरसुभा दिशेने सुसाट वेगात निघुन गेले. आपली फसवणूक झाली अन् चोरट्यांनी पैसेची बॅग घेऊन पळाले म्हणून मुळे यांनी त्याचा पाठलाग सुरु केला. अन् घडलेल्या घटनेची माहिती मालक धंनजय चौरे यांना फोन करुन माहीती दिली. चौरे यांनी घटनेची माहिती नेकनुर पोलिसांना दिली. नेकनुर पोलिसांनी तत्काळ बीड ग्रामीण पोलिसांना कळवले. मुळे यांनीही जस डायल फोन करुन पोलीस स्टेशनचा नंबर मेसेज मध्ये घेऊन पोस्टे बीड ग्रामीण येथे माहीती दिली. मुळे यांना सदर कार एक ते दीड किलोमीटर पर्यंत दिसली पुढे काही दिसली नाही. ते माजरसुभ्या पर्यंत पाठलाग करत गेले. मात्र स्वीप्ट कार मिळून आली नाही. नंतर पोलीस आले त्यांनी शोध घेतला मात्र चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. त्यावरुन अनिरुध्द संभाजी मुळे यांनी बीड ग्रामीण पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरुन पो.स्टे. बीड ग्रामीण येथे गु.र.नं. 231/2021 कलम 341,392,34 भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

2021 09 10 p3


त्याच रात्री एकिकडे पोलिसांना एक पक्का धागा पाडळसिंगी टोलनाक्यावर मिळाला होता. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख वाघ यांनी एक पथक तयार करुन ते चोरट्यांच्या मागावर पाठवले अन् अवघ्या 12 तासात त्या पथकाने पाच दरोडेखोरांच्या शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे येथून मुसक्या बांधत त्यांनी गुन्हयात वापरलेली स्विफ्ट कार क्र. (एम. एच.-12-एस. एफ-4167) व (04) मोबाईल हॅन्डसेट एकूण किंमत 5,26,000/- चा मुद्देमालासह आरोपी धनराज विश्वनाथ ठोंबरे (वय 31 वर्षे) चांगदेव लक्ष्मण भांगे (वय 24 वर्षे) शरद राजेंद्र घोळवे (वय 23 वर्षे) तिन्ही रा. सारणी सांगवी ता.केज जि. बीड, जुबेर आयुब आतार (वय 29 वर्षे रा.मल्टन ता. शिरुर जि. पुणे) व पाचवा आरोपी तुषार संपत गुंजाळ (वय 23 वर्षे रा. राहू ता. दोन्ड जि. पुणे) यांना ताब्यात घेवून बीड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय भगतसिंग दुल्लत, एएसआय हनुमान खेडकर, पो.हे.कॉ. मनोज वाघ, पो.ना. विकास वाघमारे, पो.ना. राहूल शिंदे, चालक पो.हे.कॉ. दिपक रहेकवाल यांनी केली. आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेप्रमुख पीआय संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीणचे पीएसआय पवनकुमार राजपुत यांनी तपास करत आरोपींकडून एक एक खुलासा करुन घेतला. त्यांनी हा दरोडा कसा टाकला? का टाकला? कोण कोण यामध्ये सहभागी आहे. हे त्यांनी पोलिसांना पोपटाप्रमाणे सांगण्यास सुरुवात केली. आरोपीमध्ये शरद गजेद्रं घोळवे (वय-31 व्यवसाय चालक रा. सारणी सांगवी ता. केज.जि.बीड ह.मु. शिक्रापुर ता. शिरुर जि. पुणे)हा गेल्या 10 वर्षापासून शिक्रापुर येथे राहण्यासाठी गेलेला होता. तो पत्नी प्रतिक्षा हिचेसोबत राहत आहे. अन् तेथे चालक म्हणून काम करतो. सारणी सावंगी गावातील चांगदेव भांगे आणि धनराज ठोंबरे हे त्याचे खास मित्र. धनराज विश्वनाथ ठोंबरे हा देखील चालक आहे. तो मागील काही वर्षापासून धंनजय चौरे (रा. जिवाचीवाडी ता.केज) यांच्या उंबरी फाटा केज येथील विशाल डेअरी मध्ये चालक म्हणून काम करत होता. सदर डेअरी मध्ये गोड खवा व मिल्क केक विक्री करणे व वसुली करण्याचे काम ते पाहत असे. ते संपूर्ण महाराष्ट्रात ऑर्डर येईल तसे डिलेव्हरी पोहच करतात. किरकोळ मध्ये स्वीटमार्ट व होलसेल मध्ये डिलर यांना डिलेव्हरी ही ते देतात. धनराज याच्यासह इतर चार चालक मिल्क केक च्या डेअरीमध्ये कामाला होते. मालक त्यांना 10 हजार रुपये त्याचा मोबदला देत असे. मात्र त्यातून त्यांचा उदरनिर्वाह होत असल्याने ते डिझेलची चोरी करायचे असे धनराजने मालकाला सांगितले. मालकांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त करत त्यांची 4 हजार रुपयांनी पगार वाढवली. मात्र ‘लालच बुरी बला होती है‘ धनराज याला देखील 10 हजारावरुन 14 हजार रुपये पगार करण्यात आला होता. मात्र तरी देखील त्याला पर डे 200 रुपये भत्ता हवा होता. अन् तो मालकाने दिला नसल्याने पुन्हे तो डिझेल चोरु लागला. याची कुनकुन मालकाला लागल्याने मालकाने त्याला 27 ऑगस्ट रोजी कामावरुन काढून टाकले. मात्र धनराज याने कामावर असतांनाच तो त्याचा मित्राच्या मदतीने त्यालाच लुटल्याचे भासवून कॅश लंपास करण्याचा प्लॅन करत होता मात्र त्याचे मित्र त्याला नकार देत होते. इएकडे त्यालाच कामावरुन काढल्याने त्याचा सर्व प्लॅन चौपट झाला होता. मात्र आता काहीही करुन आपल्याला कॅश लुटायचीच म्हणून त्याने दि. 03 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 12.00 वा. चांगदेव भांगे याच्या मोबाईल वरुन शिक्रापुर येथील त्याचा मित्र शरद गजेद्रं घोळवे याला फोन केला ’अन् आज विशाल दुध डेअरीची गाडी निघणार आहे’. ’आपल्याला दोन दिवसात कोणत्याही परिस्थितीमध्ये ती गाडी आडवून पैसे घ्यायचे आहे’. ’तु आज रात्री मांजरसुबा, बीड येथे एक फोरव्हिलर सोबत घेवून ये‘, असे सांगितले. चांगदेव भांगे याने सांगितले की, तु बीडला येताना जुबेर अतार याला सोबत घेवून ये शरद घोळवे याने जुबेर अतार याला बोलावून घेतले तेव्हा जुबेर अतार व त्याचे सोबत तुषार गुजांळ हा पण आला होता. जुबेर आतार हा एक पांढर्‍या रंगाची स्विफ्ट कार जिचा पासिंग (क्र. एमएच-12 एसएफ 4167) अशी कार घेवून आल्याने संध्याकाळी 6.वा.चे सुमारास ते बीडला निघाले. अंदाजे 10.वा. मांजरसुभा येथील बस स्टॅन्ड समोरील चौक येथे आले असता तेथे धनराज व चांगदेव भेटले त्यांनी मोबाईल फोन बंद करुन कार जालन्याच्या दिशेने घेतली. रात्री 01.00 वाजता जालना येथील औरगांबाद चौकात मॅनेजर लॉजवर थांबलेले होते त्यामुळे चोरट्यांनी गाडी औरगांबाद चौकातील लॉजपासून थोडया अंतरावर थांबविली अन् रात्रभर कारमध्येच झोपले. दुसर्‍या दिवशी दि. 04 रोजी सकाळी 07 वा. पिकअप सिल्लोड रोडने जात असल्याने चोरट्यांनी त्याचंा पाटलाग केला मात्र पिकअप माल टाकण्यासाठी सिल्लोडला गेले. चोरटे पिकअप येईपर्यंत राजुरला थांबले. दुपारी अंदाजे 03. वा. चे सुमारास पिकअप परत येताना दिसल्याने चोरटे पिकअपच्या पाठीमागे निघाले. चोरट्यांनी पिकअपला जालना ते गेवराई रस्त्यात थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र रस्त्यात खुप वाहन येत जात असल्याने त्यांना पिकअप थांबविता आला नाही. संध्याकाळी अंदाजे 06. वा. चे सुमारास बीड बायपास येथे रस्त्यावर जास्त वाहतूक नसल्याने चोरट्यांनी तेथे कॅश लुटण्याचे ठरवले अन् पाडळसिंगी टोलनाका येथे पिकअपला मागे टाकून सुसाट वेगाने गाडी रामनगर लक्ष्मीचौक येथे आनली. मात्र पिकअप बीडमध्ये घुसल्याने चोरट्यांना वाटले आपला डाव फसला. ते लक्ष्मी चौकातच थांबले असता पुन्हा पिकअप त्यांना येतांना दिसले अन् चोरट्यांनी बायपावर पिकप थांबवले मात्र धनराजला मॅनेजर ओळखत असल्याने तो गाडीत लपून बसला अन् एकाला गाडी चालू ठेवण्याचे सांगितले. तेव्हा कारमधून जुबेर आतार, तुषार गुजांळ व चांगदेव भागे हे तिघेजण खाली उतरले अन् मॅनेजर व पिकअप चालकाला पाठीमागे घेवून गेले नंतर चांगदेव भांगे याने पिकअप मधील पैसे असलेली काळ्या रंगाची बॅग कारमध्ये घेवून आला आणि जुबेर व तुषारला चला रे असे म्हणून ते दोघेपण कारमध्ये येवून बसले. अन् चोरट्यांनी मांजरसुभा दिशेने कार सुसाट वेगाने पळविली, पुढे काही अतंरावर डिवाडर आल्याने चोरट्यघांनी ‘यू टर्न’ मारुन कार वळवून घेतली व नामलगाव फाटा येथून मधल्या रस्त्याने पाथर्डी मार्गे शिक्रापुर येथे अंदाजे रात्री 01. 30 वा. जाऊन तेथील श्री साई लॉज येथे चांगदेव भांगे व धनराज ठोंबरे हे दोघेजण थांबले व जुबेर आतार याने शरद गजेद्रं घोळवे याला त्याच्या भाडयाने असलेले राहते घरी सोडले. जुबेर आणि तुषार ठोबरे हे दोघेजण कारमध्ये त्यांचे घरी गेले. पैशाची बॅग शरद गजेद्रं घोळवे यांने त्याच्या घरी ठेवली होती. नंतर वाटून घेण्याचे त्यांचे ठरवले. सकाळी 07.00 वा. जुबेर आतार व तुषार गुजांळ हे शरद घोळवे याच्या घरी गेले अन् त्याचेसोबत परत धनराज ठोंबरे व चांगदेव भांगे याचेजवळ साई लॉजवर आले. त्याचवेळी पोलीसांनी सापळा रचून मोठ्या शिताफिने त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्यासोबत कॅश नव्हती पोलिसांनी त्यांना कॅश संपदर्भात विचारपूस केला मात्र त्यांनी पोलिसांना तेथे उडवाउडवीचे उत्तरे दिले. चोरट्यांना 6 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची पोलिस कस्टडी सुनावली. या दरम्यान घटनेचा पीएसआय पवनकुमार राजपुत यांनी बारकाईने तपास सुरु केला. चोरट्यांकडून 8 सप्टेंबर रोजी संपूर्ण कॅश जप्त केली. पुन्हा 9 स्पटेंबर 2021 रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपी पोलीसांच्या हाती लागल्यानंतर ते तीन नसून पाच असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दाखल गुन्ह्यात दरोड्याचा कलम वाढविण्यात आला.
या संपूर्ण घटनेचा तपास पोलिस अधिक्षक राजाराम स्वामी, अप्पर पोलिस अधिक्षक सुनिल लांजेवार, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पीआय सतिष वाघ, बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेप्रमुख पीआय संतोष साबळे, एपीआय योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पवनकुमार राजपुत हे करत आहेत. त्यांना या कामी ग्रामीण पोलिस ठाण्याचे रवी जाधव आणि अंकुश वरपे यांचे मोेठे सहकार्य मिळाले. ….

Most Popular

error: Content is protected !!