विविध कारणांवरून महिलांनी केला आत्महत्येचा प्रयत्न
बीड (रिपोर्टर): जिल्हा रुग्णालयामध्ये आज सकाळी एका तासात तीन विविध ठिकाणच्या महिला विष प्राशन केलेल्या अवस्थेत दाखल झाल्या आहेत. या तिन्ही महिलांनी विविध कारणावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगण्यात येते. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सोनाली गोकुळ धुमाळ (वय 22, रा. गोंदी ता. अंबड) या महिलेने विषारी औषध प्राशन केल्याने तिला उपचारार्थ आज सकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचबरोबर कामखेडा येथील मनिषा अरुण धापसे (वय 35) या महिलेनेही विष प्राशन केल्याने तिला जिल्हा रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले. सुनिता कानिफनाथ रानमारे (वय 24) या महिलेने सुद्धा विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एका तासाभरात या तिन महिला जिल्हा रुग्णालयामध्ये सकाळी दाखल झाल्या. विविध कौटुंबिक कारणावरून या महिलांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगण्यात येते. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अंबिका नगरमध्ये एकाची आत्महत्या
शहरातील अंबिका नगर भागात असलेल्या गणेश अभिमान सोनवणे (वय 35) या तरुणाने आत्महत्या केली आहे. सदरील या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तर अंकुश नगर भागातील प्रशांत कसबे (वय 29) या तरुणाचे झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. या दोन्ही मृतदेहांचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे.