मुंबई (रिपोर्टर): महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून संभाजी भिडे यांच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जातेय. त्यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही टीका केली आहे. महात्मा गांधींना अख्ख जग नमन करतं, त्यामुळे अशा स्वरुपाचा आरोप सहन केला जाणार नाही. त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली.
छगन भुजबळ म्हणाले की, मनोहर भिडेंवर आम्ही सुद्धआ एक केस दाखल केली आहे. आमच्या बंगल्यातील आंबे खालल्यानंतर मुलगा होईल, या वक्तव्याप्रकरणी केस झाली होती. कोर्टात ती केस ढकलली जात आहे. ज्या पद्धतीने महात्मा फुलेंवर टीका करतात, तसंच आता महात्मा गांधींवरही टीका करतात. माझी खात्री आहे की पंतप्रधान मोदी, अमित शाह यांनाही हे आवडणार नाही.