बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यासह इतर ठिकाणी मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले. स्थानिक गुन्हे शाखेने चौघा जणांना ताब्यात घेतले असून या चौघा जणांकडून वीस पेक्षा जास्त चोरीच्या गाड्या आढळून आल्या असून या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे.
बीड, पुणे या ठिकाणाहून अनेक मोटारसायकली चोरीला गेलेल्या आहेत. या चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने चौघा जणांना ताब्यात गेतले. या चौघांची चौकशी केली असता त्यांनी गाड्या चोरी करून अनेकांना विकलेल्या आहेत. या विकलेल्या वीस पेक्षा जास्त गाड्या एलसीबीने जप्त केल्या. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सचीन पांडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.चे पीआय संतोष साबळे, पीएसआय तुपे यांच्यासह त्यांच्या टीमने केली आहे.