मुंबई (रिपोर्टर): संभाजी भिडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. अशी बेताल विधाने करणार्या संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर संभाजीराजे छत्रपती यांनीही प्रतिक्रिया देत भिडेंवर कारवाई का करत नाही, असा थेट सवाल सरकारला केला आहे.दरम्यान संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, सांगली येथील एक गृहस्थ महात्मा गांधी, ज्योतिबा फुले आणि तिरंगा झेंड्याबद्दल काही बोलतो, हा मोठा गुन्हा नाही का असा सवाल छत्रपती संभाजी राजे यांनी केला आहे.