वडवणी तालुक्यातील परडी माटेगांव येथील घटना
वडवणी (रिपोर्टर):- आर्थिक विवेचनातून 43 वर्षीय शेतर्याने स्वत:च्या शेतात विष प्राषण केले असता काल सायंकाळी माजलगांव येथील खाजगी दवाखान्यात उपचारार्थ त्याला दाखल करण्यात आले होते माि उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली असुन परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वडवणी तालुक्यातील परडी माटेगांव येथील अल्पभूधारक शेतकरी रामराव सुर्यभान राठोड (वय-43)या शेतकर्याने दि.27 जुलै रोजी स्वत:च्या शेतात विष प्राषण केले होते. त्यांना उपचारासाठी माजलगांव येथील योगीराज हॉस्पटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारा दरम्यान रामराव सुर्यभान राठोड यांच काल मृत्यू झाला आहे. काल त्यांच्यावर परडी माटेगांव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात आई, दोन पत्नी, एक मुलगी व मुलगा असा परिवार असुन त्यांना दिड एकर जमिन असल्याची माहिती देण्यात आली असुन एक मुलगी अविवाहित असून तिच्या लग्नाला आणि यंदा पाऊस काळ चांगला नसल्याने व अर्थिक विवेचनातून त्यांनी आत्महत्या केली आहे. या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.