बीड (रिपोर्टर): आदिवासी समाजाला अजूनही शासनाकडून योग्य त्या सुविधा मिळत नाहीत. त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात यासह इतर मागण्यांसाठी आज आदिवासी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये अनेकांचा सहभाग होता.
आदिवासी समाज घरकुल, जात प्रमाणपत्र यासह आदी सुविधांपासून वंचित आहे. शासन या समाजाकडे दुर्लक्ष करत असून आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठी आज क्रांतीवीर विरसा मुंडा, आदिवासी सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी सुनील बळवंते, घाणे एम.एस., सावंत कैलास, विठ्ठल जाधव, प्रकाश मेढे यांच्यासह आदींचा सहभाग होता.