कुमावत यांच्या पथकाची रंजेगाव शिवारात कारवाई
एका टिप्परसह जेसीबी जप्त; दोघेजण ताब्यात; अवैध वाळू उपसा करणार्यांना दणका
बीड(रिपोर्टर): रंजेगाव शिवारातील सिंदफना नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा होत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमावत यांना झाल्यानंतर त्यांच्या पथकाने काल कारवाई करत एक जेसीबी, एक ट्रॅक्टर जप्त केले आहे, यात दोघाजणांना ताब्यात घेण्यात आले.
सिंदफना नदीपात्रातून सर्रासपणे अवैधरित्या वाळूचा उपसा सुरूच आहे. वाळूमाफियाविरोधात कठोर कारवाई होत नाही, रंजेगाव शिवारातून वाळू उपसली जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांना झाल्यानंतर त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी धाड मारून एका जेसीबीसह एक ट्रॅक्टर जप्त केले. ही कारवाई पोलीस हे.कॉ.अतिश देशमुख, संतराम थापडे, गणेश नवले, चव्हाण यांनी केली. या प्रकरणी पिंपळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.