टाकण्याची घाई; न.प. प्रशासनाने लक्ष घालावे
बीड(रिपोर्टर): जुना धानोरा रोडवरील जिजाऊ नगर ते कदम यांच्या घरादरम्यान सिमेंट रस्त्याचे काम होत आहे. रस्ता करत असतांना रस्त्यामधील पाण्याचे लिकेज काढणे गरजेचे होते मात्र लिकेज न काढताच सिमेंट टाकण्याची घाई सुरू करण्यात आली. काही ठिकाणी लिकेजद्वारे पाणी निघू लागल्याने हा रस्ता तयार होण्याआधीच खराब होवू लागला. याकडे नगर पालिका प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी केली जावू लागली.
जुना धानोरा रोडवरील जिजाऊ नगर या भागातील रस्त्याचे काम करण्यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासूनची मागणी होती, त्यानुसार या रस्त्याचे काम सुरू झाले. सदरील हा रस्ता सिमेंटचा होत आहे. रस्ता करण्यापूर्वी रस्त्यादरम्यान जे पाण्याचे लिकेज आहेत ते गुत्तेदाराने काढायला हवे होते मात्र लिकेज न काढताच त्यावर सिमेंट टाकणे सुरू आहे. काही ठिकाणी लिकेजद्वारे पाणी वाहू लागल्याने रस्ता पुर्ण होण्याआधीच खराब होवू लागला आहे. रस्त्याच्या दर्जाकडे नगर पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे नसता 15 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचा इशारा या भागातील नागरीकांनी दिला आहे. सदरील रस्ता दर्जेदार व्हावा अशी मागणी येथील नागरीकांची आहे.