बीड (रिपोर्टर): बीडच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागातील सानप कैलास रावसाहेब या कर्मचार्याची कनिष्ठ अभियंता या पदासाठी पदोन्नती होत असताना त्याबाबतची संचीका या कार्यालयातून गहाळ करून मानसिक त्रास देत असल्याबद्दल त्यांनी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बीड यांना आत्मदहन करण्याची परवानगी मागितली आहे.
बांधकाम विभागात कैलास सानप हे कार्यरत असून ते कनिष्ठ अभियंता या पदासाठी पदोन्नतीसाठी पात्र आहेत. मात्र तेथील कनिष्ठ प्रशासन अधिकारी त्यांची संचीका सुडबुद्धीने चुकीच्या पद्धतीने कार्यकारी अभियंत्याकडे सादर करत आहेत. त्यामुळे त्यांचे प्रमोशन होणार नाही. या नैराश्यातून त्यांनी कनिष्ठ प्रशासन अधिकार्याच्या छडाला कंटाळून मी आत्महदन करण्याचा निर्णय घेतला असून तशी परवानगी द्यावी, असे त्यांनी लेखी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या अर्जाच्या प्रती त्यांनी मानव अधिकार आयोग आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. आणि पोलीस अधिक्षकांना दिले आहे. त्यांच्या या अर्जामुळे जि.प. बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे.