सैनिकाच्या बहिणीची छेडछाड
कारवाई करण्याची पोलीस अधिक्षकांकडे मागणी
बीड (रिपोर्टर): देशसेवेसाठी कार्यरत असलेल्या एका सैनिकाच्या बहिणीची छेडछाड होत असून याप्रकरणी संबंधिताविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सैनिकाच्या कुटुंबियाने व त्रिदल सैनिक सेवा संघाच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.
साक्षाळपिंप्री येथील एक तरुण सैन्यामध्ये कार्यरत आहे. या सैनिकाच्या बहिणीची छेडछाड करून त्यांच्या कुटुंबियांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलीसात गुन्हाही दाखल आहे. या प्रकरणी वरिष्ठांनी दखल घेऊन दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्रिदल सैनिक संघाच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.