तत्कालीन बीईओ टेकाळे यांनी केल्या होत्या तक्रारी
बीड (रिपोर्टर): शिक्षण विभागातील माटे, आतकरे, बाहेगव्हाणकर यांच्या बाबतीत गेल्या काही दिवसांपूर्वी तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल जि.प.चे सीईओ अविनाश पाठक यांनी घेतली असून त्यांना निलंबनाबाबत नोटीसा बजावण्यात आल्या असल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले आहे.
अविनाश पाठक यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी सीईओच पदाचा पदभार घेतला होता. गैरकारभार करणार्या अधिकार्यांसह कर्मचार्यांवर त्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. शिक्षण विभागातील माटे, आतकरे आणि बाहेगव्हाणकर यांच्या बाबतीत तत्कालीन गटशिक्षणाधिकारी टेकाळे यांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल आत्ता सीईओ अविनाश पाठक यांनी घेतली असून सदरील अधिकार्यांना निलंबनाबाबतच्या नोटीशी बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या नोटीशींमुळे शिक्षण विभागामध्ये एकच खळबळ उडाली आहे.