संतप्त शेतकर्यांचा रास्ता रोको
तेलगाव (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातील काही मंडलांमध्ये अग्रीमची घोषणा करण्यात आली असून इतर मंडलांना मात्र डावलण्यात आले आहे. तेलगाव महसूल मंडलाचाही अग्रीममध्ये समावेश करावा, या प्रमुख मागणीसाठी शेतकर्यांनी आज तेलगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.
तेलगाव, भोपा, कोथिंबीरवाडी, चाटगाव, कांदेवाडी, कासारी, बोडखा, कारी, काठेवाडी, भोगलवाडी, काळ्याचीवाडी, धुनकवड यासह आदी गावांचा अग्रीममध्ये समावेश करावा, या मागणीसाठी आज शेतकरी जनआंदोलन समितीच्या वतीने तेलगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो शेतकर्यांचा सहभाग होता.







