जालना जिल्ह्यातील सराटे अंतरवली येथील आंदोलना दरम्यान झालेल्या पोलिशी लाठी हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पोलिसांच्या या कृतीची तातडीने चौकशी करण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई केली जावी, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते पुढे म्हणतात, जालना जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या घटनेचा निषेध. शांततामय पद्धतीने आजवर समाजाने अनेक आंदोलने यशस्वी केली आहेत, व्यक्तिगत माझाही प्रत्येक आंदोलनात सहभाग राहिला आहे. पोलीसांच्या या कृतीची तातडीने चौकशी करण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी…मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी 2007 साली बीड जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असताना ठराव मांडणारा मी एक कार्यकर्ता आहे. एकजुटीच्या या लढ्यात मी सदैव एक कार्यकर्ता म्हणून सोबत आहे व कायम राहील. फ






