शहर कडकडीत बंद, सर्वपक्षीय रँली काढून आरक्षणाची केली मागणी
वडवणी (रिपोर्टर):- मनोज जरंगे पाटील यांचे शांतते चाललेले आंदोलन काल पोलीसांनी लाटीचार्ज करुन चिघळले आहे. या घटनेचा निषेधार्थ व मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज सकाळी वडवणीतील शेकडो मराठा समाजा रस्त्यावर उतरुन आक्रोश व्यक्त केला. तर यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेच कालच्या घडलेल्या घटनेला जबाबदार असल्याने त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आलेल्या आहेत.
वडवणी शहरासह तालुक्यातील मराठा समाज बांधव हे विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे एकत्र येत भव्य रँली काढली यामध्ये सर्वपक्षीय सहभागी झाला होता.काल घडलेल्या घटनेला राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असल्याने पाऊस पडला गाराचा.,,,देवेंद्र फडणवीस …आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे….राज्य सरकारचे करायचे काय खाली मुंडके वर पाय… यासह अन्य घोषणा देण्यात आल्या सदरील रँली मुख्य रस्त्यावरुन छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी थांबली यावेळी मोजक्या समाज बांधवाचे भाषणे झाल्यानंतर समाजाच्या विविध मागण्याचे निवेदन हे तहसिल प्रशासनाला देण्यात आले आहे.यावेळी शेकडो समाजातील तरुण रस्त्यावर उतरला होता. सरकार विरोधात घोषणा देत काल झालेल्या घटनेला फडणवीसच जबाबदार असल्याने त्यांच्या विरोधात देखील घोषणा देण्यात आल्या आहेत.यावेळी शेकडो मराठा समाज बांधवासह अनुचित प्रकार घडू नये यासाठी एपीआय अमन सिरसट यांच्य मार्गदर्शनाखाली तगडा पोलीस बंदोस्त ठेवण्यात आला होता.







