सिरसाळा (रिपोर्टर):- छत्रपती शिवाजी पार्क सिरसाळा येथे अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी येथील मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांततेत व लोकशाही पद्धतीने चाललेल्या आंदोलन कर्त्यावर अमानुषपणे लाठीचार्ज केला असल्याने त्यांना समर्थन देण्यासाठी व मराठा समाजाचा ओ.बी.सी. मध्ये समावेश करावा या मागणीसाठी पंचक्रोशीतील मराठा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन चालू आहे या आंदोलनाला सिरसाळा परिसरातील अनेक युवक व मराठा समाजातील वयोवृद्ध व्यक्तींनी पण पाठिंबा देण्यासाठी सिरसाळा येथील दुसरा दिवस असलेल्या आंदोलन स्थळी हजेरी लावताना दिसुन येत आहेत परिसरातील जेष्ठ नागरिक मारोती निर्मळ, कृष्णा देशमुख ,रोहिदास निर्मळ, बाळासाहेब गरड,गोविंद देशमुख,बाळासाहेब कदम ,दत्ता मोरे , शंकर पाटील व युवक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत .