डीपीआयचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
बीड (रिपोर्टर)- वनविभागासाठी 13 कोटी रुपयांचा निधी शासनाने दिलेला होता. मात्र या निधीचा दुरुपयोग भ्रष्ट कर्मचार्यांनी केला असून या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी डिपीआयच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे.
वन विभागाला 13 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला होता. या निधीचा योग्य पद्धतीने वापर करण्यात आला नाही. सदरील निधी हडपण्यामध्ये कैलास गिते, काकडे, सिरसाठ, चिकटे, अंगद बहिरवाळ, गाडेकर, टाकणखार, वरवडे, मोरे, राठोड, चौरे, धसे, मोहळकर यांचा सहभाग असून या सर्व कर्मचार्यांची चौकशी करून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी डीपीआयच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. या वेळी डीपीआयचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे, जिल्हाध्यक्ष सुभाष लोणके, सुनील पाटोळे, केशव लोंढे, बाळासाहेब पौळ, भारत कानडे, बाळासाहेब दोडके, अभिमन्यू चांदणे, अमोल मैंदेकर, आनंद चांदणे, बबन थोरात, अशोक वाघमारेंसह आदींची उपस्थिती आहे.







