गेवराई (रिपोर्टर)- जुन्या भांडणाची कुरापत काढून सतत त्रास देत असल्याने या त्रासाला कंटाळून एका 46 वर्षीय इसमाने विषारी द्रव प्राशन करत आत्महत्या केली. या प्रकरणी तलवाडा पोलिसात मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीमंत संतराम मिसाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक असे की, गोरख कोंडीबा वक्ते, वय 46 वर्षे (रा. सिरसदेवी) असे मयत इसमाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीमंत संतराम मिसाळ यांच्या सोबत वक्ते यांचे काही कारणास्तव भांडण झाले होते. या भांडणाला कंटाळून वक्ते यांनी 19 सप्टेंबर रोजी विषारी द्रव प्राशन केले होते. त्यांना तात्काळ उपचारासाठी जिचल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचाा दरम्यान त्यांचा 20 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी काल मयत वक्ते यांच्या पत्नी वैशाली यांनी तलवाडा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून श्रीमंत संतराम मिसाळ (रा. सिरसदेवी) याच्या विरोधात कलम 306, 506 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.