बीड (रिपोर्टर)- सार्वजनिक ठिकाणी दोन गट आपसात भिडल्याने सार्वजनिक शांतता भंग झाल्या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई संतोष विलास रणदिवे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 21 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता बीड शहरातील हनुमान चौकात घडली.
बीड शहरातील हनुमान चौकात 21 सप्टेंबर रोजी दोन समाजातील काही तरुण एकत्र येत आपसात भांडत होते. यामुळे सार्वजनिक शांतता भंग झाली. याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्तळी धाव घेतली. तोपर्यंत आपसात भांडणारे दोन्ही गटातील तरुण पसार झाले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात पोलीस शिपाई रणदिवे यांनी फिर्याद दिल्याने त्यांच्या फिर्यादीवरून कलम 160 नुसार गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.