उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळांना समज द्यावी. अन्यथा माझ्या नादाला लागल्यावर मी सोडत नाही, अशा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. ते सराटी येथे मराठा कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. जरांगे पाटील म्हणाले, गोदा पट्ट्यातील 123 गावांतील 22 गावांनी पैसे दिले आहेत. आणखी 101 गावांकडेही पैसे शिल्लक आहेत. पण, पैसे घेतले नाहीत. कारण, हे आंदोलन पैशांसाठी नाहीतर न्यायासाठी आहे. भुजबळांना जमिनी घेण्याचं वेड लागलं आहे. पैसे जनतेचे खातात. त्यामुळे भुजबळांना वाटलं आपण सभेसाठी जमीन विकत घेतली आहे. आम्ही कोटी हा शब्द पहिल्यांदा ऐकला आहे. आम्ही दुसर्यांकडून पैसे घेऊन दुचाकीत पेट्रोल टाकतो. मग सात कोटी रूपये कुठून पाहणार? अजित पवार यांनी भुजबळांना समज द्यावी. अन्यथा माझ्या नादाला लागल्यावर मी सोडत नाही, असं जरांगे पाटलांनी म्हटलं.