बीड (रिपोर्टर) बंडखोर आमदारासह मंत्र्याच्या कार्यालयासह घरासमोर शिवसैनिक आंदोलन करत आहेत. काही ठिकाणी राडेबाजीसुद्धा झाली. जशास तसे उत्तर देण्याच्या पावित्र्यात बंडखोर आमदारांचे समर्थक रस्त्यावर उतरू लागले. बीडमध्ये तानाजी सावंत समर्थकांनी नगर रोडवर चांगलाच राडा केला. रस्त्यावर उभी असलेली गाडी फोडत सावंत यांच्या समर्थनार्थ प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी केली. या घटनेने पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे.
शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे हे काही आमदारांना सोबत घेऊन गेल्या सहा दिवसांपासून आसाम येथे आहे. बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करत त्यांच्या घरासह कार्यालयासमोर राडे करत आहेत. याला जशास तसे उत्तर देण्याच्या भूमिकेत आता बंडखोरांचे समर्थक रस्त्यावर उतरू लागले. बीड येथे आ.तानाजी सावंत यांच्या समर्थनार्थ छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नगर रोडवर घोषणाबाजी करत रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीची तोडफोड केल्याने शहरात एकच खळबळ उडाली. तानाजी सावंत यांचे समर्थन करणारे छावा संघटनेचे अशोक रोमणसह आदी कार्यकर्ते आहेत. ही घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे. या प्रकरणी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.