धारदार शस्त्राने हल्ला
बीड (रिपोर्टर)- बील देण्याच्या कारणावरून हॉटेलमालक आणि ग्राहकात झालेल्या वादानंतर ग्राहकावर धारदार शस्त्राने हल्ला करत जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
अतुल अभिमान गुंड (रा. स्वामी विवेकानंद शाळेजवळ, गुंड गल्ली, केज) यांनी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. 14 रोजी ते अंबाजोगाई रोडवरील राजकिरण बिअरबार येथे मित्रासह गेेले होते. जेवण झाल्यानंतर बिलाचे पैसे काऊंटरवर ठेवल्याचा राग मनात धरून हॉटेल मालक रोहन कोमटवार, विजय कोमटवार (रा. राजकिरण बार, अंबाजोगाई रोड, केज) व पंकज तेलंग (रा. कानडी रोड, केज) यांनी संगनमत करून अतुल गुंड यासह त्याच्या मित्राला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून दारदार शस्त्राने वार केले व जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी केज पोलिसात गु.र.नं. 621/2023 कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नाईक स्वप्ने हे करत आहेत.