नेकनूर पोलिसांनी पुण्याहून आणले आरोपीस
नेकनूर (रिपोर्टर)- लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीस पळवून नेण्यात आले होते. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलीस पळवून नेणारा आरोपी मुलीसोबत पुणे येथे असल्याची माहिती नेकनूर पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जावून आरोपीसह मुलीस ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावामध्ये अल्पवयीन मुलीस अनिल गोपीकिशन खंदारे (वय 27 वर्षे) याने 12 ऑक्टोबर 2023 रोजी पळवून नेले होते. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. खंदारे हा पुणे येथील लोणी पाडगाव येथे असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत व ठाणेप्रमुख विलास हजारे यांना झाल्यानंतर यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन गुट्टेवार, अनिल राऊत यांनी घटनास्थळी जावून आरोपीसह मुलीस ताब्यात घेतले. या प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.