गेवराई (रिपोर्टर)-मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी सुरू असलेल्या गेवराई शहरातील उपोषणस्थळावर आज 7 वर्षाखालील शेकडो मुलांना एकत्रित करत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांच्या पुढार्यांच्या फोटोवर मुत्रविसर्जन करत निषेध व्यक्त करून गेवराईतील मराठ्यांनी आपला संताप व्यक्त केला.
गेवराई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषण सुरू आहे. याठिकाणी दोन दिवसापासून माऊली गंगाधर व बाळासाहेब दाभाडे या बांधवांनी आमरण उपोषण सुरू केलेले आहे. याठिकाणी रोज तालुक्यातील एक सर्कल मधील समाज बांधव सहभागी होऊन साखळी उपोषण करत आहेत. आज या उपोषणस्थळी मराठा समाज बांधवांच्या वतीने सात वर्षाखालील लहान मुलांना एकत्र करून सर्व राजकीय नेत्यांच्या फोटोचे बॅनर करून त्यावर सर्व मुलांनी लघुशंका करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. दरम्यान या आंदोलनस्थळी रोज प्रबोधन व्याख्यान, कीर्तन, यासारखे कार्यक्रम राबवत आगळ्यावेगळ्या पद्धतीने हे आंदोलन करण्यात येत आहे.