बीड (रिपोर्टर)- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठ आंदोलन सुरू असताना अचानक आ. प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला झाला. यानंतर जमावाने तुफान दगडफेक करत जाळपोळ केली. या घटनेतील पोलिसांनी 250 लोकांची ओळख पटवली असून रात्री अठरा जणांना ताब्यात घेतले. त्यापूर्वी 17 हल्लेखोरांना पोलीस ताब्यात घेतले होते.
बीड जिल्ह्यात झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनांचा तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. माजलगाव येथील आ. प्रकाश सोळंके यांच्या घरावर होत असलेली जाळपोळ आणि दगडफेकी दरम्यान खुद पंकज कुमावत यांच्यावरही हल्ला झाला होता. यामध्ये त्यांचे अंगरक्षक आणि चालक जखमी झालेले आहेत. या हल्ल्यातील आतापर्यंत 250 लोकांची ओळख पटली आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेद्वारे आरोपींची ओळख पटवत आहेत. आतापर्यंत 35 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.