बीड (रिपोर्टर): गेल्या तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसाने जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त पिकांची पाहणी जिल्हाधिकरी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केली.
बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाने कापूस, ज्वारी, भाजीपाला यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने महसूल विभागाला दिले. आज जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी सफेपूर येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या वेळी त्यांच्या समवेत तहसीलदार सुहास हजारे, कृषी अधिकारी जेजूरकर यांच्यासह आदी कर्मचार्यांची उपस्थिती होती.











