चोरटे सीसीटिव्ही कॅमेर्यात कैद
फुटेज पोलीसांकडे सपूर्त
मोबाईल चोरीला गेल्याची फिर्याद
वडवणी (रिपोर्टर):- चार ते पाच अज्ञात चोरट्यांचा वावर दिसून आला असून तीन ठिकाणी चोरीचा चोरीचा डाव फसला आहे. या घटनेतील चोरटे सीसीटिव्ही कॅमेर्यात कैद झाले आहेत तर सदरील फुटेज देखील पोलीसांकडे सपूर्त केले असून हि घटना वडवणी तालुक्यातील मौजे काडीवडगांव येथे काल मध्यरात्री घडली आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वडवणी तालुक्यातील मौजे काडीवडगांव येथील रहिवाशी आसणारे शेतकरी विश्वास बन्शीधर बादाडे यांच्या घराशेजारील असणाऱ्या गोठ्यामधून दोन ते चार दिवसांपुर्वी गाय चोरीला गेली आहे या प्रकरणी गुन्हा देखील नोंद करण्यात आला आहे आणि यांच्याच घरी दि.30 नोंव्हेबरच्या मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास पुन्हा अज्ञात चोरट्यांनी घरी मुख्य गेटच्या प्रवेशाद्वारातून घरात प्रवेश केला परंतु मुख्य घराचे दोन्ही दरवाजे चोरट्यांना तुटले नसल्याने अज्ञात चोरट्यांचा चोरी करण्याचा डाव याठिकाणी फसला आहे. यामध्ये अज्ञात चार ते पाच चोरटे असून याठिकाणी सीसीटिव्ही कँमेरे असल्याने सीसीटिव्ही कँमेरामध्ये कैद झाले आहेत. तर याच वेळी व्यकंट आसाराम बादाडे यांच्या घरी देखील चोरट्यांनी प्रवेश केला हे घरात एकटे असल्याने यांचा फायदा घेत तोंडावर गुंगीचा स्प्रे मारला व घरात ढुडाळा घेतला असता घरात काहीच मिळून न आणाल्याने घरातील दोन मोबाईल चोरटे घेऊन गेले आहेत.तर याप्रकरणी एक मोबाईल चोरीला गेला असल्याचा वडवणी पोलीसांत फिर्याद देखील दिली आहे. यानंतर महादेव काशीनाथ हतागळे यांच्या घराला देखील चोरट्यांनी लक्ष केले होते यांची वयोध्द आई एकटीच घरात राहत असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि या घरातील 25 हजार रुपये ठेवलेले पैसे चोरट्यांनी चोरून घेऊन गेले आहेत.तर या प्रकरणातील कोणतेच पुरावे नसल्याने फक्त व्यकंट आसाराम बादाडे यांच्या फिर्यादीवरुन मोबाईल चोरील गेला असल्याच्या कारणाने वडवणी पोलीसात अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून सदरील प्रकारातील सीसीटिव्ही कँमेरातील फुटेज पोलीसांच्या ताब्यात देखील देण्यात आले आहे.
तपासात उघड होईल – एपीआय
या प्रकरणी मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार घेतली आहे. या प्रकरणी सीसीटिव्ही कँमेरतील फुटेज देखील ताब्यात घेतण्यात आले असून तपासात जे निष्पण होईल त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल तसेच या प्रकरणाचा तपास करण्यात येईल अशी प्रतिक्रिया वडवणी पोलीस स्टेशनचे एपीआय अमन सिरसट यांनी दिली आहे.