आज सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयांत बीड तालुका पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकी प्रसंगी बोलताना जिल्हा प्रमुख गणेश वरेकर म्हणाले की शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे साहेब यांनी माझ्यावर बीड आणि माजलगाव विधानसभा मतदार संघाची जिल्हा प्रमुख म्हणून निवड केली आहे त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो मी सार्थ ठरवणार आहे मी जिल्ह्यातील सर्व अजी माजी पदाधिकारी लोप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन पक्ष वाढी चे काम करणार व येणाऱ्या निवडणुकीत पक्षाला विजयी करण्यासाठी जीवाचे रान करणार या बैठकीत सर्वानुमते पक्ष वाढी चे नियोजन करण्यात आले या बैठकी साठी खालील पदाधिकारी उपस्थित होते शिवसेना जिल्हा समन्वयक भाई संजय महाद्वार, उपजिल्हा प्रमुख हनुमंत जगताप, बंडू भाऊ पिंगळे, जिल्हा संघटक नितीन धांडे, सहसंघतक रतन गुजर शहर प्रमुख शेख निजाम, तालुका प्रमुख गोरख शिंघन, सुशील पिंगळे, गोरक्षनाथ कदम, संदीपान कदम, रामनारायण जाधव, लक्ष्मण शिंदे, संतोष वरेकर, संतोष हिंगणे, सुधीर काकडे, समाधान हींगणे माचिंद्रा कुटे हे उपस्थित होते











