बीड (रिपोर्टर): देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भरघोस विजयाची मुसंडी मारून यशाची परंपरा कायम राखली. देशभरात विजयाचा आनंद साजरा केला जातो आहे. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा. राजेंद्र मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत संघर्षयोद्धा भाजपा जनसंपर्क कार्यालयासमोर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष ढोलताशांचा गजरात फटाक्यांची आतिषबाजी करून विजयोत्सव साजरा केला.

यावेळी प्रा. देविदास नागरगोजे, चंद्रकांत फड, सलीम जहांगीर, डॉ.लक्ष्मण जाधव,अजय सवाई, शांतिनाथ डोरले, बालाजी पवार, मुसा खान, डॉ.अभय वनवे, शरद नवले, किरण बांगर, अनिल चांदणे, लताताई मस्के, डॉ. जयश्रीताई मुंडे, शरद बडगे, शरद घोलप, आप्पासाहेब झोडगे, बद्रीनाथ जटाळ, सोमनाथराव माने, अमोल वडतिले, शफिक पेंटर, सचिन आगाम, कल्याणराव पवार, सुरेश माने, चव्हाण टेलर, बंडू वाजे, राकेश बिराजदार, महेश सावंत, केशव बडे, अभय चव्हाण, रसाळ सर, लक्ष्मण भिंगले, डोईफोडे गणेश, संध्याताई राजपूत, अनिताताई जाधव, लताताई राऊत, दुष्यंत डोंगरे, नितीन आमटे, अश्विन शेळके, अजय ढाकणे, चंदकांत फड, लालासाहेब पन्हाळे आदीसह कार्यकर्ते बहुसंखेने उपस्थित होते.











