बीड (रिपोर्टर) महाराष्ट्रातील सर्व दुकानदारांनी मराठी भाषेतून फलक लावावा, यासाठी आज मनसेच्या वतीने रॅली काढण्यात आली होती. आवाहन करूनही मराठी भाषेतून फलक न लावल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
आज मनसेने मराठी पाट्या लावण्यासंदर्भात शहरातून रॅली काढली. या वेळी शहराध्यक्ष करण लोंढे, यश जगताप, विकास आहेर, अमोल पालवे यांच्यासह आदींचा सहभाग होता. आवाहन करूनही शहरातील दुकानदारांनी मराठी भाषेतून पाट्या लावल्या नाहीतर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.











