उपचारा दरम्यान दोघांचा हि दुर्दैवी मृत्यू
वडवणी (रिपोर्टर):- घरची अंत्यत हालाखीची परस्थिती असणाऱ्या दोन विवाहित तरुणाचा दुचाकी अपघातात जखमी होऊन उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमध्ये वडवणी शहरातील 30 वर्षीय तर बाहेगव्हाण येथील 36 वर्षीय तरुणाचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
वडवणी शहरातील रहिवाशी आणि मसनजोगी समाजातील असणारा तरुण शिवाजी कोचांअण्णा शेनुरे ( वय-30 वर्ष ) हा तरुण भंगारचा व्यवसाय करुन उपजिविका भागवत होता. पत्नीला मानसिक आजार जडल्याने तिला दोन दिवसांपुर्वी जालना येथील रुग्णालयात उपचार घेऊन माहेरी अंबड याठिकाणी सोडले.काल सकाळीच अंबड येथून बदलापूर मार्गे दुचाकी स्लेंडर गाडीवरुन (एमएच – 20 डिजे 5850) वडवणीकडे येत आसताना काल दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास पाचोडच्या अलीकडे अंदाजे 9 किलो मीटर अंतरावर समोरुन येणाऱ्या दुचाकीची (गाडी नंबर उपलब्ध झाला नाही) धडक बसली आणि यामध्ये शिवाजी कोचांअण्णा शेनुरे हा तरुण गंभीर जखमी झाला असल्याने त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकिय रुग्णालयात दाखल केले आसता लवकर उपचार मिळाले नसल्याने त्यांचा उपचारा दरम्यान दुदैवी मृत्यू झाला आहे. शिवाजी शेनुरे याच्या पश्चात पत्नी, दोन मुलं व दोन मुली असून आज दुपार नंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर दुसरी घटना बाहेगव्हाण येथील रहिवाशी असणारा 36 वर्षीय तरुण लायक इस्माईल शेख हा स्व;ताच्या दुचाकीवरुन वडवणीकडे येत आसताना तेलगांव रोडवरील शहरा नजीक थ्री स्टार हाँटेल जवळ पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली यामध्ये लायक शेख हा तरुण गंभीर जखमी झाला असून डोक्याला आणि मेंदूला इजा झाली असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगरातील खाजगी सिटी केअर हाँस्पिटलला उपचारासाठी दाखल केले होते. मेंदूचे देखील आँपरेशन झाले होते. परंतु घरची परस्थिती अंत्यत नाजूक असल्याने घरच्या मंडळीनी व नातेवाईकांनी लायक शेख यांना बीड येथील शासकिय दवाखान्यात उपचारासाठी आणले होते. परंतु उपचाराला योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने लायक शेख यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. रात्री अकरा वाजता दफणविधी करण्यात आला आहे. यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे.तर हा अपघात दि.23 नोंव्हेबर रोजी झाला होता.या दोन्ही अपघातात तरुण पोरांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याने वडवणी शहरासह तालुक्यात हाळहळ व्यक्त केली जात आहे.











