बीड(रिपोर्टर): पालवण चौक परिसरातील धानोरा रोडची अवस्था अत्यंत वाईट आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्याचा त्रास वाहनधारकांसह नागरीकांना सहन करावा लागत आहे. संबंधीत विभाग रस्ता दुरूस्तीकडे दुर्लक्ष करत असून रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू आहे. धानोरा रोड परिसरातील रस्ता गेल्या काही महिन्यापासून नादुरूस्त आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यामुळे वाहनधारकांना आपली वाहने चालवण्यास अडचण निर्माण होवू लागली आहे. रस्त्याच्या दुरूस्तीसंदर्भात आतापर्यंत अनेकवेळा संबंधीत विभागाकडे तक्रारी केल्या मात्र याची दखल संबंधीत विभागाने घेतली आहे. रस्त्याच्या कामासंदर्भात कौशक मस्केसह आदींचे अमरण उपोषण सुरू आहे.