Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईम‘त्या’ बालकाचा खूनच धारुर पोलिसांत गुन्हा नोंद

‘त्या’ बालकाचा खूनच धारुर पोलिसांत गुन्हा नोंद


किल्ले धारूर ( रिपोर्टर) धारुर तालुक्यातील सोनिमोहा येथे एका ६ वर्षाच्या बालकावर अज्ञात पशुने हल्ला केल्याची चर्चा होत होती मात्र सदरील हा प्रकार पशुहल्ल्याचा नसून खुनाचा असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील हा तपास डीवायएसपी कुमावत व धारूर पोलिसांनी लावला असून यामध्ये वनविभागाची भूमिका महत्वपूर्ण ठरली. सहा वर्षाच्या मुलाला कोणी आणि कशासाठी मारलं असावं याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.


याबाबत मिळालेल्या माहितीनूसार धारुर तालुक्यातील सोनिमोहा येथे गावाच्या उत्तरेस असलेल्या मिरास नावाच्या शेतजमीनीत सहा वर्षीय बालक यशराज दत्तात्रय दराडे हा बालक गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. यशराजच्या चेहर्‍यावर गंभीर जखमा आढळून आल्या होत्या. आजोबाने जखमी यशराजला अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र रविवारी रात्री उपचार सुरु असताना बालकाचा मृत्यू झाला. बालकाचे वडिल दत्तात्रय आश्रोबा दराडे यांचा शेळी व मेंढीपालनाचा व्यवसाय आहे. ते पत्नीसह तेलगावला राहतात तर यशराज हा आजोबा सोबत सोनीमोहा येथे राहत होता. यशराजवर वन्य प्राण्याचे हल्ला केल्याची चर्चा होती. सदर प्रकारानंतर पोलिस प्रशासनासह वन विभागाने प्रकाराची सखोल चौकशी केली. केजचे उपविभागीय पोलिस अधिकारी तथा अतिरिक्त पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांनी घटनास्थळी भेट दिली. प्राथमिक वैद्यकीय अहवालानूसार पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी घटनास्थळ पिंजून काढला. यावेळी वनविभागाचे अधिकारी कर्मचारीही हजर होते. यात वन्यप्राण्याचे कसलेही ठसे अथवा खानाखूणा आढळून आले नाहीत. बालकाचा गळा चिरला गेला असल्याने सदरील प्रकार हा खुनाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. रात्री उशिरा धारुर पोलिसांत अज्ञात व्यक्ती विरोधात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. धारुर पोलिस ठाण्याचे प्रभारी नितिन पाटील सध्या रजेवर असल्यामुळे या घटनेचा तपास बीड येथील पोलिस निरिक्षक पुरुषोत्तम चोबे यांच्याकडे देण्यात आला आहे. सदर प्रकारानंतर पोलिसांची वाढलेली वर्दळ पाहता सोनिमोहा गावात खळबळ उडाली आहे. मात्र सदर प्रकरणाचा उलगडा पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पीआय पुरुषोत्तम चोभे हे करत आहेत. यशराजला कोणी आणि का मारले हे पोलीस तपासात निष्पन्न होईल, आम्ही लवकरच आरोपीच्या मुसक्या बांधू, असे रिपोर्टरशी बोलताना पीआय पुरुषोत्तम चोभे म्हणाले.

Most Popular

error: Content is protected !!