बीड (रिपोर्टर): मनोज जरांगे पाटील यांची 23 डिसेंबर रोजी बीड येथे इशारा सभा होत असल्याने त्यापूर्वी जिल्हा पोलिसांनी 400 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. सभेच्या दरम्यान कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमा ठाकूर यांनी दिली आहे.