अंबाजोगाई लातूर रोडवर रात्री घडली घटना
अंबाजोगाई (रिपोर्टर): धावत्या कारने अचानकपणे पेट घेतल्याने गाडीतील एकाजणाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री अंबाजोगाई-लातूर महामार्गावर बर्दापूरजवळ घडली. मयताची उशिरापर्यंत ओळख पटलेली नव्हती. या प्रकरणाचा अधिक तपास बर्दापूर पोलीस करत आहेत.
अंबाजोगाई लातूर राष्ट्रीय महामार्गावर कार क्र. एमएच 08 आर 7879 या गाडीने अचानक बर्दापूर (अंबाजोगाई) पाचपीर दर्गा जवळ पेट घेतला. या आगीत गाडीतील एकाजणाचा होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती बर्दापूर पोलीसांना झाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. आग विझवण्यासाठी आग्नीशामक दलाला बोलविण्यात आले होते. सदरील जळालेली कार लातूर येथील असल्याचे सांगण्यात येते. आतील मयत व्यक्तीची उशिरापर्यंत ओळख पटलेली नव्हती. ही आग नेमकी कशी लागली, यात किती प्रवाशी होते हेही समोर आले नव्हते. याचा अधिक तपास बर्दापूर पोलीस करत आहेत.