Friday, October 22, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईशिवसेना नेते संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल होणार

शिवसेना नेते संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल होणार


मुंबई (रिपोर्टर)- शिवसेना नेते संजय राऊत यांना आज लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. संजय राऊत यांच्यावर गतवर्षी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल एक वर्षानं त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्यानं ते आज पुन्हा लीलावती रुग्णलयात दाखल होणार असून त्यांच्यावर पुन्हा अँजिओप्लास्टी करण्यात येणार असल्याचं कळतंय.


लीलावती रुग्णालयातील डॉ. मॅथ्यू आणि डॉ. मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करणार आहे. आज संध्याकाळी संजय राऊत रुग्णालयात दाखल होणार असून गुरुवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. गतवर्षी संजय राऊत यांच्यावर यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉक आढळले होते त्यामुळं शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्यावर एप्रिल 2020मध्ये आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. तीच शस्त्रक्रिया उद्या करण्यात येणार आहे. राज्यात सत्ता स्थापन झाल्यापासून राऊत सतत पत्रकारांशी बोलत होते. महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून संजय राऊत यांनी सरकारची बाजू मांडण्याचे काम केले. विरोधकांनी केलेल्या टीकेनंतरही त्यांनी सरकारची बाजू मांडत होते. सामनाचे संपादक म्हणूनही त्यांच्यावर वेगळी जबाबदारी होती. या ताणतणावाच्या परिस्थितीचा मोठा ताण राऊत यांच्यावर होता

Most Popular

error: Content is protected !!