Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeबीडगेवराईउद्या फेडरेशनच्या 9 जीनिंगची सुरुवात शेतकर्‍यांच्या कापसाची होणार खरेदी

उद्या फेडरेशनच्या 9 जीनिंगची सुरुवात शेतकर्‍यांच्या कापसाची होणार खरेदी


बीड (रिपोर्टर)- कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी अनेक यातना सहन केल्यानंतर राज्य पणन महासंघाच्या वतीने बीड जिल्ह्यामध्ये दुसर्‍या टप्प्यात वडवणी, गेवराई आणि बीड या तालुक्यातील 9 जीनिंग शुभारंभ होत असून कापूस उत्पादक शेतकर्‍यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.


गेल्या आठ दिवसांपूर्वी सीसीआय अंतर्गत जीनिंग सुरू झाल्या आहेत. या जीनिंगमध्ये केंद्र शासनाच्या कापूस हमी योजनेअंतर्गत कापसाची खरेदी सुरू आहे. मात्र सीसीआयच्या जीनिंगवर कापूस उत्पादक शेतकर्‍यांची मोठी गर्दी होत असल्याने फेडरेशन अंतर्गतच्या जीनिंग सुरू करण्याची मागणी शेतकर्‍यांकडून होत होती. त्या अनुषंगाने माजलगाव तालुक्यातील तीन जीनिंग, धारूरमधील तीन आणि केजमधील तीन या जीनिंग पणन महासंघाच्या वतीने सुरू करण्यात येत आहे. या जीनिंगवरही केंद्र शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत कापसाची खरेदी करण्यात येणार आहे. त्यामध्ये 5 हजार 800 ते 5 हजार 500 या हमी भावात कापूस उत्पादक शेतकर्‍यांचा कापूस खरेदी केला जाणार आहे. बीड जिल्ह्यात सर्वात दोन मोठ्या जीनिंग आहेत त्यामध्ये धारूर तालुक्यातील भोपा येथील जीनिंगचा समावेश आहे. या जीनिंगची खरेदी क्षमता मोठ्या संख्येने असल्याने या जीनिंगकडे कापूस उत्पादक शेतकर्‍यांचा विक्रीसाठी ओढा जास्त असतो. त्यामुळे शेतकर्‍यांना ही जीनिंग सुरू होत असल्यामुळे दिलासा मिळेलाला आहे. आतापर्यंत सीसीआयअंतर्गत किती कापूस खरेदी केला याची आकडेवारी बाजार समितीकडून उपलब्ध झालेली नाही. दुसरीकडे मात्र अडचणीतील शेतकर्‍यांनी आपला कापूस खासगी व्यापार्‍यांना घातल्यामुळे नुकसान झाले आहे.

Most Popular

error: Content is protected !!