Wednesday, January 27, 2021
No menu items!
Home बीड परळी माजी मंत्री पंकजा मुंडेंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

माजी मंत्री पंकजा मुंडेंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह


बीड (रिपोर्टर)- मला सर्दी खोकला आणि ताप असल्याने मी जबाबदारी स्वीकारून स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे, अशी माहिती भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली होती. त्यानंतर पंकजा यांची कोविड चाचणी करण्यात आली. त्याबद्दलची अपडेट त्यांनी बुधवारी दिली. त्यांची करोना चाचणी निगेटिव्ह आल्याचं सांगत त्यांनी त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.

पंकजा यांच्या ट्विटनंतर धनंजय मुंडे यांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. तसंच भाऊ म्हणून मी तुझ्यासोबत आहे असंही म्हटलं होतं. त्यानंतर आज पंकजा यांनी स्वत: माहिती दिली. माझी कोविडची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. ज्यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि काळजी व्यक्त केली त्यांचे आभार!! मी डॉक्टरांच्या चर्चेनंतर परत एकदा टेस्ट करेन. त्यानंतरच मी सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावेन अशी माहिती त्यांनी ट्विट करून दिली.

Most Popular

ड्रग्ज आऊट ऑफ कंट्रोल शहरात एकाचा बळी

ग्राऊंड रिपोटींग- शेख रिजवान कोडिन व कॉस्मेटीक पदार्थाचा जास्त...

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पोलीस अधिक्षक आर. राजा यांचा सन्मान

*जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना विभागीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थी , पोलीस दलातील...