आरक्षणाचा प्रश्न सोडवा, नसता कायदा सुव्यवस्था बिघडली तर जबाबदारी सरकारची -सोन्नर
बीड (रिपोर्टर): धनगर आरक्षण एसटीच्या आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शब्द देऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने आज संतप्त धनगर समाजबांधव भारत सोन्नर यांच्या नेतृत्वात एकवटून रस्त्यावर आले. शहरातून भव्य मोटारसायकल र्रली काढत सरकारच्या भूमिकेच्या निषेधार्थ घोषणा दिल्या आणि ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. त्याठिकाणी सोन्नर यांनी धनगर आरक्षण एसटीची तात्काळ अंमलबजावणी करा, नसता धनगर समाज यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करेल, त्यावेळेस कायदा व सुव्यवस्था बिघडली तर त्याची जबाबदारी पुर्णत: सरकारची असेल, असा अंतिम इशारा देत आपल्या मागण्णयांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना दिले.

धनगर आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळत पडलेलाआहे. दहा वर्षापूर्वी सत्तेत येताच सर्वप्रथम धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवू, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला दिला. मात्र गेल्या दहा वर्षांच्या कालखंडात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यानंतर पुन्हा त्यांच्या हाती सत्ता आली, मात्र धनगर समाजाचा प्रश्न सुटला नाही. आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी गेल्या महिनाभरापूर्वी येत्या काही दिवसात धनगर आरक्षण एसटीची अंमलबजावणी करू, असा शब्द दिला. मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने अकेर आज संतापलेला धनगर बांधव रस्त्यावर ुतरला. यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष भारत सोन्नर यांच्या नेतृत्वात बीडमध्ये भव्य रॅली काढण्यात आली. हाती पिवळे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरलेल्या धनगर बांधवांनी सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. सदरची रॅली ही जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकली. त्याठिकाणी भारत सोन्नर यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून धनगर बांधवांचा हा प्रश्न रखडत पडलेला आहे. सरकार वेळकाढूपणा करत धनगर समाजाची अवहेलना करत आहे, लोकसभा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाचा हा प्रश्न सुटला नाही तर समाज बांधव संतप्त होत रस्त्यावर उतरतील, तेव्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची संपुर्ण जबाबदारी सरकारची असेल, असा इशारा देत धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडविण्याची मागणी केली. या वेळी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.












