रायमोहा (रिपोर्टर)ः- मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीत नारायण राणे यांनी अपशब्द वापर्यांने सर्वत्र संताप व्यक्त केला जावू लागला. आज रायमोहा येथे राणे पिता पुत्रांचा पुतळा जाळून जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी अनेक मराठा बांधवांची उपस्थिती होती.
गेल्या अनेक महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहे. सध्या त्यांचे आमरण उपोषण सुरू आहे. अशा स्थितीत नारायण राणे यांनी जरांगे यांच्या बाबतीत अपशब्द वापरले. याबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जावू लागला. आज रायमोहा येथे नारायण राणे व त्यांच्या पुत्राचा पुतळा जाळून जाहीर निषेध करण्यात आला आहे. राणे यांच्या विरोधात प्रचंड प्रमाणात घोषणा बाजी करण्यात आली होती.












