वडवणी (रिपोर्टर):- दुचाकीची समोरा समोर धडक होऊन एक जण जागीच ठार झाला आहे.तर एक जणाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाला आहे. हि घटना काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुसरा फाट्या जवळ घडली आहे.

वडवणीकडून तेलगांवकडे जाणारी स्पेंलेडर गाडी क्रं. एमएच 44 एम 3193 व तेलगांवकडून वडवणीकडे येत आसतानाची प्लसर गाडी क्रं. एमएच 44 व्हि 5594 ह्या दुचाकी गाड्याची समोरासमोरा जबरदस्त धडक बसली असून यामध्ये दोन्ही गाड्यावरील चालकांना मार लागला होता. तर स्पेंलेडर गाडीवरील चालक टोकेवाडी येथील रहिवाशी असल्याच सांगण्यात येत आहे.(नाव समजू शकले नाही ) वय अंदाजे 30 वर्ष हे जागीच ठार झाले आहेत. तर प्लसर या दुचाकीचा चालक व पुसरा येथील युवक विकास शहादेव झोडगे (वय -27 वर्ष ) याला उपाचारासाठी बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु गंभीर मार लागला असल्याने त्यांचा देखील रात्री 11 वाजता उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर सदरील परस्थिती पाहता गाड्याचा चक्काचूर झाल्याचे दिसून आले आहे. या अपघातातील दोन्ही गाड्या वडवणी पोलीस स्टेशनला जमा करण्यात आल्या आहेत.












