बीड (रिपोर्टर): राजुरी ते शिवणी झालेल्या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
राजुरी ते शिवणी रस्त्याच्या कामाची गुणनियंत्रण विभागामार्फत तपासणी करण्यात यावी, संथगतीने चालणार्या या कामाची गती वाढविण्याची मागणी करण्यात आली. बीड येथील नॅशनल हायवे क्र. 561 शिरापूर ते बार्शीनाका ते जरुड फाटा येथील रस्त्याच्या कामाचे कंत्राट दिलेल्या साकेत कंन्स्ट्रक्शनची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यायासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वसीम शेख, अविनाश वडमारे, विनोद गेणा, कारेडे विनोद, प्रेम कांबळे, मिना लोंढे, सुशील गायकवाड व प्रतिक वाघमारे यांची उपस्थिती होती.












