बीड (रिपोर्टर): बीडमध्ये महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून याचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री गिगरीष महाजन, कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि महिला बालकल्याणमंत्री आदित्य तटकरे यांच्या हस्ते होत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिली आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, 24 फेब्रुवारी रोजी या सोहळ्याचे उद्घाटन होत आहे. हा सोहळा छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी होत असून उद्घाटनाला मंत्री गिरीष महाजन, मंत्री धनंजय मुंडे, आदिती तटकरे सिनेअभिनेता मकरंज अनासपुरे यांच्यासह आदींची उपस्थिती राहणार आहे. दरम्यान क्रीडा महोत्सवाची सुरुवात 19 ते 21 फेब्रुवारी या दरम्यान करण्यात आली. 24 फेब्रुवारी रोजी कृषी महोत्सव, 25 फेब्रुवारीला काईट फेस्टीव्हल यासह आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकार्यांनी दिली आहे.