xधरून आणलेला मेकॅनिक जावई पळाला तर वकिल जावयाने युक्तिवाद करून सुटला मात्र शेवटी तिसरा ड्रायव्हर जावई सापडला !
केज (रिपोर्टर): गर्दभ सवारीसाठी ताब्यात घेतलेला एक जावई ऐनवेळी सर्वांना गुंगारा देऊन पळून गेल्यामुळे गावकर्यांनी दुसरा एक वकील जावई शोधला मात्र त्यांनी गावकर्या सोबत युक्तिवाद करून सुटका करून घेतल्याने जावई गावकर्यांची दमछाक झाली. पण अखेर त्यांनी तिसरा जावई पकडून आणून त्याची गाढवावर बसवून मिरवणूक काढलीच.
बीड जिल्ह्यातील विडा या गावात अनोखी परंपरा असून धुलीवंदनाच्या दिवशी येथे जावयाला पकडून आणून त्याची वाद्यांच्या ताला सुरात मिरवणूक काढली जाते पण जावई मात्र गाढवावर बसविलेला असतो अन गावकरी व तरुण वाद्यांच्या तालावर बेधुंद होऊन नाचत असतात. तर गावातील महिला पुरुष यात सहभागी होऊन ही अनोखी मिरवणूक पहात असतात. मात्र या वर्षी जावई शोधण्यात गावकर्यांना खूप पळापळ करावी लागल्याने चांगलीच दमछाक झाली. गावकर्यांनी ऐन होळीच्या सणा दिवशी शेजारच्या बुरुंडवाडी येथील अशोक सोनवणे हे विडा येथील अंकुश पवार यांच्या जावयाला ताब्यात घेतले होते. मात्र सायंकाळी 6:00 वा अशोक भोसले हे सर्वांच्या हातावर तुरी देऊन पळून गेले. गाढवावर बसवून मिरवणुकीची तयारी सुरू करण्या पूर्वीच गावकर्यांनी ताब्यात घेतलेला मेकॅनिक जावई बहाद्दर निघाला. त्याने गावकर्यांना गुंगारा देऊन परांगदा झाले. मात्र त्या नंतर गावकर्यांनी चक्क एका वकील जावईच ताब्यात घेतला. मात्र वकील जावयाने बुद्धी चातुर्याने गावकर्या सोबत युक्तिवाद करून सुटका करून घेतली. मग मात्र गावकरी हैराण झाले. तिसर्या एका जावयाला अन त्यांनी ट्रॅक्टर ड्रायव्हरला याची कुणकुण लागल्याने शेतात जाऊन लपून बसलेला शिंदी येथील पप्पु जाधव हे एकनाथ पवार यांचे जावई ताब्यात घेऊन त्याची गाढवावरून मिरवणूक काढली. यावेळी गावातील आबालवृद्ध महिला सहभागी झाले होते पप्पू जाधव यांना गाढवावर बसवून गळ्यात हार घालून व गाढवाच्या गळ्यात खेटरांची माळ घालून डीजेच्या तालात मिरवणूक काढली मिरवणूक मारुती मंदिराच्या पारावर येताच सरपंचांनी पप्पू जाधव यांना कपड्यांचा आहेर केला आणि पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी घातली.