बीड (रिपोर्टर): आष्टी तालुक्यातील सराटे वडगाव या ठिकाणी कार्यरत असलेले जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक शेंडगे यांना गैरवर्तवणुकीबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पाटील यांनी निलंबीत केले आहे.
शेंडगे यांच्याबाबत विद्यार्थी आणि पालकांच्या अनेक तक्रारी होत्या. ते शाळेवर उपस्थित राहत नव्हते. याबाबतचा वस्तूनिष्ठ अहवाल गटशिक्षणाधिकारी कार्यालय, आष्टी यांनी बीड जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्याकडे पाठवला होता. या अहवालाची दखल घेत शेंडगे यांना प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संगीतादेवी पाटील यांनी तडकाफडकी निलंबीत केले. त्यामुळे कामचुकार शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.










