• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

‘श्रावणी बाळा, बापुला माफ कर’ म्हणत शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

by गणेश सावंत
March 15, 2025
Reading Time: 1 min read
0
‘श्रावणी बाळा, बापुला माफ कर’ म्हणत शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

‘त्या’ सहा राक्षसांनी माझे हाल हाल केले’ म्हणत चिठ्ींत लिहिले सहा जणांची नावे

बीड, (रिपोर्टर)ः- शहरातल्या स्वराज्य नगर भागात असलेल्या कृष्णा अर्बन कॉ.ऑप बँकेच्या प्रांगणामध्ये गळफास घेवून एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदरचा शिक्षक हा केज तालुक्यातील देवगाव येथील मुळ रहिवाशी असून केळ गाव येथील आश्रम शाळेवर शिक्षक म्हणून गेल्या अठरा वर्षांपासून कार्यरत होता. या कालावधीमध्ये संबंधित शिक्षकाला संस्था चालकाकडून कुठलाही पगार देण्यात आलेला नव्हता. शिक्षकाने आत्महत्या का केली? हे कारण पुढे अद्याप आले नसले तरी संबंधित शिक्षकाने फेसबुकवर एक पोस्ट करून ‘श्रावणी बाळा, तुझ्या बापुला शक्य झालं तर माफ कर’ अशी पोस्ट लिहित संस्था चालक विक्रम बाबुराव मुंडेसह त्यांच्या मुलांनी आणि अन्य लोकांनी छळ केल्याचे म्हटले आहे. घटनेची माहिती कळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी गेले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.


   केज तालुक्यातील देवगाव येथील धनंजय अभिमान नागरगोजे हे विक्रम मुंडे यांच्या केळगाव येथील आश्रम शाळेवर गेल्या अठरा वर्षांपासून शिक्षक म्हणून काम करत होते. आज सकाळी त्यांचा मृतदेह बीड शहरातील स्वराज्यनगर भागात असलेल्या विक्रम मुंडे यांच्याच कृष्णा अर्बन को.ऑप. बँकेच्या प्रांगणामध्ये लटकताना दिसून आला. धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या केल्याचे यातून स्पष्ट झाले असून घटनेची माहिती शिवाजीनगर पोलीसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत शिक्षक धनंजय नागरगोजे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी धनंजय नागरगोजे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये ‘श्रावणी बाळा, तुझ्या बापुला शक्य झाल्यास माफ कर, मी माफी मागण्या लाईक नाही’, असे म्हणत ‘तू तीन वर्षाची आहे, तुला बापू काय कळणार, बाळा बापुंनी कधी कुणाचं नुकसान केलं नाही, सर्वांसोबत चांगला वागला, परंतु या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे’, असे म्हणत विक्रम बाबुराव मुंडे, विजय मुंडे, अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड, ज्ञानेश्‍वर राजाभाऊ मुंडे या सर्वांनी माझा खूप छळ लावलाय, मला हाल हाल करून मारणार आहेत’, असे लिहित नागरगोजे यांनी आपलं जिवन संपवलं. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
0000
000

शेवटची फेसबुक पोस्ट काय?
      श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर, मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही. बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्नं बघितली होती पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागले, काय करू? माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाह. कधी मी कुणाला दोन रुपयांनाही फसवलं नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतलं नाही.श्रावणी बाळा, शक्य झालंच तर कर एकदा तुझ्या बापूला माफ, कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे. तुला अजून काही कळत नाही, तुझं वय आहेच किती, तीन वर्षे… तुला काय कळणार ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही. बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही. सर्वांसोबत चांगला वागला पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे. विक्रम बाबुराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतूल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड, ज्ञानेश्वर रजेभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे. मला हे हालहाल करुन मारणार आहेत.मला मारण्याचं कारण म्हणजे मी फक्त विचारलं होतं की, मी तुमच्या शाळेवर गेली 18 वर्षे झालं काम करतोय अजून मला पगार नाही, आता पुढे काय करायचं? त्यावर विक्रम बप्पा म्हणले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा हे एकूण माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि तिथून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली. श्‍चउरी -ललळवशपीं : पार्टनरशिपमध्ये जिम, एकाची 15 दिवसाची लेक, दुसर्‍याची बायको प्रेग्नंट, पुण्यातील सख्ख्या मित्रांचा एकत्रच अपघाती मृत्यूश्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसामुळेच मी तुझ्यापासून दूर जात आहे. तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो. काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला नाही. बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही. श्रावणी मला माफ कर माफी मागण्याच्या पण लायकीचा नाही मी, तरी पण शक्य झालं जेव्हा तुला कळेल तेव्हा माफ कर, आता मी थांबतो खूप त्रास होतोय मला. विक्रम बाबुराव मुंडे, विजयकांत विक्रम मुंडे, अतूल विक्रम मुंडे, उमेश रमेश मुंडे, ज्ञानेश्‍वर राजेभाउ मुरकुटे, गोविंद (अमोल) नवनाथ आव्हाड हे सर्व मझ्या माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत. कारण यांनी मला खूप त्रास दिला आहे. यांच्यामुळेच मी माझे जीवन संपवित आहे. आतापर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनानी माफ करावे. सर्वांना माझा शेवटचा रामराम

Previous Post

ठाकरेंच्या शिवसेनेत सातपुतेंच्या जागी उल्हास गिरामांची नियुक्ती

Next Post

तलावातले पाणी झपाट्याने कमी होऊ लागले

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post
तलावातले पाणी झपाट्याने कमी होऊ लागले

तलावातले पाणी झपाट्याने कमी होऊ लागले

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?