बीड, (रिपोर्टर)ः- ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये कोट्यावधी रूपयांचा अपहार झालेला आहे. या प्रकरणी मल्टीस्टेटच्या चेअरमनसह अधिकार्यावर व संचालक मंडळावर गुन्हे दाखल झालेले आहेत. शाखा व्यवस्थापक जोगदंड व वित्तीय अधिकारी सुरवसे या दोघांनी जामीनीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला होता. त्यांचा अर्ज खंडपीठाने फेटाळून लावला आहे.
ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये कोट्यावधींचा अपहार झाला. या प्रकरणात तत्कालीन सहाय्यक वित्तीय अधिकारी संतोष सुरवसे आणि शाखा व्यवस्थापक संतोष जोगदंड यांच्यावर देखिल गुन्हे दाखल झाले आहे. जामीनीसाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला होता. खंडपीठाचे न्यायमुर्ती अभय एस. वाघवसे यांनी यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. दोन्ही अर्जदारातर्फे अॅड.आर.जी हंगे आणि अॅड.एस.ई. शेकडे यांनी न्यायालयास विनंती केली की दोघेही सदर सोसायटीचे कर्मचारी असुन त्यांना कुठलाही निधी मंजुर अथवा वितरीत करण्याचा अधिकार नाही. त्यांच्यापेक्षा इतर वरिष्ठ अधिकारी आदेश देतात त्यांचे पालन ते दोघे करतात. फसवणूकीच्या रक्कमेतून त्यांना काहीही लाभ मिळाला नाही. ते जुलै 2024 पासून तुरूंगात आहे. सदरील गुन्हयाचा तपास पुर्ण झाला असून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले. गुन्ह्यता कुठलाही शोध अथवा कुठलीही वसुली बाकी नाही. संपूर्ण तपास कागदोपत्री आहे. अर्जदाराच्या कोठडीची आवश्यकता नाही म्हणुन दोघांना जामीन मंजुर करण्याची विनंती वकीलांनी केली हेाती. मात्र त्यांची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली.








