बीड, (रिपोर्टर)ः- केज मतदार संघाच्या आ.नमिता मुंदडा यांनी डॉ. अशोक थोरात यांच्या संदर्भात विधीमंडळात प्रश्न उपस्थित करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर आरोग्य मंत्र्यांनी थोरात यांचे निलंबन केले. या निलंबनाच्या कारवाईनंतर जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन केले. चांगल्या अधिकार्याचा बळी राजकारणामुळे जात असून त्यांचे निलंबन रद्द करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून गेल्या काही महिन्यापुर्वी डॉ.अशोक थोरात यांची नियुक्ती झाली. थोरात आल्यापासून त्यांनी जिल्हा रूग्णालयाला चांगली शिस्त लावली. गोर गरीब रूग्णांवर वेळेवर उपचार होवू लागले. त्यामुळे थोरात यांची सर्व सामान्यात चांगली क्रेझ आहे. काल विधीमंडळात केजच्या आ.नमिता मुंदडा यांनी थोरात यांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. आरोग्य मंत्री थोरात यांचे निलंबन केल्याने जिल्ह्यातील नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. चांगल्या अधिकार्यांचा राजकारण्यांनी बळी घेतला. त्यांचे निलंबन रद्द करण्यात यावे असे म्हणत सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.








