रस्त्याच्या कडेला अनेकांनी थाटले होते दुकाने

चौसाळा, (रिपोर्टर) ः रस्त्याच्या कडेला अनेकांनी अतिक्रमण करत दुकाने उभारले होते. आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटवले आहे. काहींनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले होते. सदरील हे बांधकाम जेसीबीने तोडण्यात आले आहे. बांधकाम हटवण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती. बांधकाम हटवण्यात आले नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला कारवाई करावी लागली.
चौसाळा येथील रस्त्याच्या कडेने अतिक्रमण करण्यात आले होते. या अतिक्रमणामुळे रहदारीला अडथळे निर्माण होत होते. अतिक्रमण हटवण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस बजावली होती. मात्र, बांधकाम हटवण्यात येत नसल्याने आज ग्रा.पं. व सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हाटवले. काही अतिक्रमण पक्के करण्यात आले हो





