
आदिशक्ती मुक्ताईंच्या पालखीचे बीडमध्ये जल्लोषात स्वागत
बीड, (रिपोर्टर)ः- मृदंगावर थाप, टाळांचा गजर, हाती भगव्या पताका, मुखी हरिनाम, विठ्ठल… विठ्ठल… चा निनादने अवघे बीड आज दुमदुमून गेले. महाशक्ती, आदिशक्ती, संत मुक्ताबाई यांची पालखी बीडमध्ये डेरे दाखल होताच शहरातील हजारो वारकर्यांनी संत मुक्ताईचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. रस्त्यावर रांगोळ्या, ढोलताशा, फटाक्याची आतिषबाजी करत मुक्ताईचे शहराता सुस्वागतम् करण्यात आले. दोन दिवस संत मुक्ताई बीडमध्ये मुक्कामी असणार आहे. शहर भरात आज भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या तीन दिवसापासून बीड जिल्ह्यात डेरेदाखल असलेल्या आदिशक्ती मुक्ताबाईची पालखी आज बीड शहरात डेरे दाखल झाली.


मुक्ताईंच्या दर्शनासाठी आणि स्वागतासाठी उभे बीडवासी पालखी मार्गावर मुक्ताईंच्या पालखीचे स्वागत आणि दर्शन घेत होते. मुदंगावर थाप पडली जात होती. टाळांचा गजर होत होता, वारकर्यांच्या हाती असलेल्या भगव्या पताका आकाशात डौलाने मिरवत होत्या. मुकी हरिनामा बरोबर विठ्ठल… विठ्ठल… चा निनादाने अवघे बीड शहर दणाणून गेले होते. शहरातल्या मुख्य रस्त्यावरून ही पालखी मुक्कामी ठिकाणी (माळीवेस) गेली. आदिशक्ती, मुक्ताई यांच्या दर्शनासाठी दोन दिवस बीडकरांना संधी आहे. मुक्ताई आपल्या अभंगातून सातत्याने संत तोची जाण जगी । दया,क्षमा ज्याचे अंगी ॥ लोभ अहम नवे मन । जगी विरर्त तोची जान ॥ असे सांगत आल्या आहेत. बीड जिल्हा ही संतांची भुमी आहे. भक्तीचा मेळा बीड जिल्ह्यात रोज कुठे ना कुठे लागलेला असतो. मुक्ताई आपले पंजोबा गोविंदपंत यांची या दोन दिवसामध्ये भेट घेतात. या सर्व कालावधीमध्ये बीड शहर हरिनामाने आणि विठ्ठल नामाने दणाणून जाते.






